पावसाचा जोर पुन्हा वाढला, पंचगंगा काठच्या गावांना इशारा; कोणत्याही क्षणी घेतला जाणार हा निर्णय
intensity of rain has increased : राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९०.०७ टक्के भरले असून १६०० क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सध्या विद्युत विमोचनमधून सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू असून धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात सुरु असल्यामुळे आज रात्री उशिरा किंवा उद्या दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HsojQlA
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HsojQlA
Post a Comment