Live: करोना आटोक्यात येईना; राज्यात धोका वाढला!
मुंबई: राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून शनिवारी एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली. शनिवारी ८११ नागरिक बाधित आढळल्यामुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ७६२८ झाला आहे. तर, आतापर्यंत २३२ जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी... लाइव्ह अपडेट्स: >> औरंगाबाद: शहरातील आसेफिया कॉलनीतील ३५ वर्षीय आणि समतानगरातील ६५ वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५१ >> मुंबई: ओरिएण्टल बँकेच्या कांदिवली ठाकूर व्हिलेज येथील शाखेचा मॅनेजर कोविड पॉझिटिव्ह; बँकेतील सर्व कर्मचारी क्वारंटाइन >> राज्यात आतापर्यंत ११९ रुग्णांवर यशस्वी उपचार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती >> राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला; एका दिवसांत ८११ नव्या रुग्णांची नोंद
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y3SWbm
Post a Comment