पोलीस ठरला करोनाचा बळी; पिंपरी-चिंचवडमध्ये चिंता वाढली
पिंपरी: वाहतूक शाखेच्या चाकण वाहतूक विभागात कार्यरत असलेले हवालदार यांचे संसर्गामुळे आज निधन झाले. पिंपरी-चिंचवड दलातील करोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. ( ) वाचा: संतोष झेंडे यांना मागील काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. संतोष झेंडे सुरुवातीला मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी पुणे शहर, पुणे वाहतूक विभाग, पिंपरी, एमआयडीसी भोसरी येथे सेवा बजावली. सध्या ते पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या चाकण विभागात हवालदार पदावर कार्यरत होते. वाचा: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३४ अधिकारी आणि २४० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील ३० अधिकाऱ्यांनी तर १८४ कर्मचाऱ्यांनी करोनावर यशस्वी मात केली असून, इतरांवर उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त बाहेरून पिंपरी-चिंचवड शहरात बंदोबस्तासाठी आलेल्या १० कर्मचाऱ्यांना देखील करोनाची लागण झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील करोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. यामुळे शहर पोलिसांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहरातील पोलिसांना कारोनावर यशस्वी मात करता यावी म्हणून पाच खासगी रुग्णालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jsdoKl
Post a Comment