Header Ads

ad

सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळली, महिला अडकली!

मुंबई: परिसरात एका सार्वजनिक शौचालयाची भिंत कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. दुर्घटनाग्रस्त शौचालयात एक महिला अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. कुर्ला पश्चिमेकडील नाझ हॉटेलच्या जवळ ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महापालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाली. कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. मागील काही दिवसात व आसपासच्या शहरात इमारतीचे भाग कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुंबईत अलीकडंच एक जुनी इमारत कोसळली होती. त्याआधी भिवंडी येथे अशीच दुर्घटना घडली होती. आणखी वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35UJevq

No comments