Header Ads

ad

संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला; भाजपचा टोला

मुंबई: शिवसेनेचे खासदार यांनी पुण्यातील कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री यांच्यावर टीका करण्याची संधी साधली आहे. राज्यातील राजकारणाच्या केंद्रबिंदूविषयी संजय राऊत यांनी काल एक वक्तव्य केलं होतं. 'महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे झालं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता. बराच काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण मुंबईतून घडत होते. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत,' असं राऊत म्हणाले होते. 'राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तेव्हा सरकारमधील जेष्ठ नेते म्हणून शरद पवार मार्गदर्शन करतात. तिकडे मोदी देखील इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतंय? असा प्रश्नही राऊत यांनी केला होता. मात्र, भाजपनं राऊत यांच्या केंद्रबिंदूच्या विधानावरून उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. वाचा: 'बाळासाहेब होते तेव्हा मुंबई हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आता (पवार साहेबांमुळे) तो पुणे झाला आहे...असं बोलून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला आहे,' असं भाजपच्या मीडिया सेलचे प्रतिनिधी यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2HISE43

No comments