सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; आंतरजिल्हा आरोपींना अटक
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्रीच्या सुमारास सिंदेवाही-नागभीड मार्गावर करण्यात आली. सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे आणि विकास अजय शर्मा अशी अटकेतील चोरट्यांनी नावे आहेत. घरफोडी, वाहनचोरी प्रकरणातील आरोपी पळ काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं आहे. तपासणीत चोरट्यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. तसंच काही अंतरावर दोन दुचाकी लपवून ठेवल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी सुमारे २ लाख ८० हजार ५६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस उपनिरीक्षक सचिन गदादे, राजेंद्र खनके, गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी, विनोद जाधव यांच्या पथकाने केली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zY1EYv
Post a Comment