Header Ads

ad

दहशत माजवण्याच्या प्रयत्न; २ आरोपींना तलवारीसह शहर पोलिसांनी केली अटक

: शहरात दहशत माजवण्याच्या प्रयत्नात असलेल्या २ आरोपींना तलवारीसह शहर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. तसंच या प्रकरणातील दोन आरोपी फरार झाले आहेत. शुभम येनगंटीवार, साहिल शेख असं अटकेतील आरोपींची नावे आहेत, तर सुशांत वाजपेयी, अविनाश पडोले हे दोघे फरार असून त्यांचा शहर पोलिस शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी युवकांनी चंद्रपुरात गोळीबार केल्यावर शहरात आता गुंडगिरी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या हातात तलवारी घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याची या युवकांची स्टाइल झाली आहे. यामधील काही युवक पोलिसांच्या रेकॉर्डवरील व काही नवखे आहेत. चंद्रपूर शहरातील तरुण-तरुणींच्या फिरण्याचं स्थान म्हणजे शहरातील रामाला तलाव चौपाटी परिसर या रहदारीच्या मार्गावर काही युवक चारचाकी वाहनात शस्त्रे घेऊन दहशत माजवण्याच्या प्रयत्न करत होते. या घटनेची माहिती शहर पोलीस पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभागाचे वाघमारे आणि कोरडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन २ कोयते आणि १ तलवार जप्त करत २ युवकांना ताब्यात घेतलं आहे. मात्र २ युवक पळण्यात यशस्वी झाले. पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fgGrkB

No comments