राज्यात करोना रुग्णसंख्येमध्ये घट; तिसऱ्या लाटेचा धोका असतानाच...
मुंबई: राज्यात संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना दुसरी लाट आता बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ४ हजार ६९६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आज करोनाने आणखी ५२ रुग्ण दगावले आहेत तर राज्यातील मृत्यूदर सध्या २.१२ टक्के इतका आहे. ( ) वाचा: राज्यात करोनाचा ग्राफ खाली येत आहे. नवीन बाधितांच्या तुलनेत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आजच्या नोंदीनुसार राज्यात करोनाचे ५१ हजार ८३४ आहेत. यात मुंबईबाबत दिलासा देणारी बातमी म्हणजे मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ३ हजार ५०४ इतकी खाली आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार ७१७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर जिल्ह्यात ही संख्या ७ हजार १५६ इतकी आहे. अहमदनगर जिल्ह्यात ५ हजार ९६१, सातारा जिल्ह्यात ५ हजार ४२१, सांगली जिल्ह्यात ४ हजार ३५६, सोलापूर जिल्ह्यात ४ हजार ६८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यातील स्थिती वेगाने सुधारत असून अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १ हजार ४७० इतकी आहे. वाचा: करोना संसर्गाची राज्यातील आजची स्थिती - राज्यात आज ५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. - सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. - आज राज्यात ३ हजार ७४१ नवीन रुग्णांचे निदान. - आज ४ हजार ६९६ रुग्ण बरे होऊन परतले घरी. - राज्यात आजपर्यंत एकूण ६२,६८,११२ करोना बाधित रुग्ण झाले बरे. - राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०२ % एवढे. - आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३८,१२,८२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६०,६८० (१२.०१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले. - सध्या राज्यात २,८८,४८९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २,२९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. - राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या सध्या ५१ हजार ८३४ इतकी. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gHB0fi
Post a Comment