Header Ads

ad

'त्या' वैमानिकाचा नागपुरात मृत्यू; विमानाचं केलं होतं इमर्जन्सी लँडिंग

नागपूर: मस्कत येथून येथे जाणारे विमान चालवत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एअरलाइन्सचे वैमानिक (वय ४४) याला आपात्कालीन लँडिंग करत येथे दाखल करण्यात आले होते. मागील चार दिवसांपासून त्याचा आयुष्याशी संघर्ष सुरू होता. अखेर आज कय्युम यांची प्राणज्योत मालवली. ( ) वाचा: ढाक्याला जाणाऱ्या विमानाचे शुक्रवारी सकाळी ११.४० वाजता इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. सहवैमानिकाने परिस्थिती हाताळत विमानतळावर विमान सुरक्षित उतरविले होते. त्या विमानात १२६ प्रवासी होते. त्या सर्व प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करत ढाका येथे सुरक्षितरित्या पोहचविण्यात आले होते. तर कय्युम याच्यावर किंग्जवे हॉस्पिटलमध्ये डॉ. सुब्रजित दासगुप्ता, डॉ. रंजन बोरकर, डॉ. वीरेंद्र बेलेकर यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू होते. वाचा: मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने कय्युम कोमात गेले होते. रविवारी ते ब्रेन डेड झाल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. सोमवारी सकाळी ११ वाजतादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, नौशाद कय्युम यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७७ रोजी ढाका येथे झाला. २० सप्टेंबर २००२ मध्ये बिमान बांगलादेश एअरलाईन्समध्ये वैमानिक म्हणून रुजू झाले होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Dvc0BK

No comments