एकनाथ खडसे नेमके आहेत कुठे?; कन्या रोहिणी यांनी दिली 'ही' माहिती
जळगाव: पुण्यातील येथील भूखंड खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊस व घरावर ईडीने जप्तीची कारवाई केल्याची केवळ अफवा आहे, असे स्पष्ट करतानाच एकनाथ खडसे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत, अशी माहिती खडसे यांच्या कन्या व जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड. यांनी 'मटा'शी बोलताना दिली आहे. ( ) वाचा: भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडून खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. खडसे यांचे जावई यांना याप्रकरणात ईडीने अटक केलेली आहे तर खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मंदाकिनी खडसेंनी वेळ मागून घेतला आहे. दुसरीकडे, स्वतः खडसेंची देखील या प्रकरणात चौकशी झाली आहे. वाचा: याच प्रकरणात ईडीने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील खडसेंचे फार्म हाऊस व निवासस्थान सील केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. खडसे यांना ईडीने ताब्यात घेतल्याचीही वार्ता पसरली होती. याबाबत खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी माहिती दिली असून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. या बाबी निव्वळ अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही. शिवाय कोणतीही जप्तीची कारवाई झालेली नाही किंवा नोटीसही आलेली नाही, अशी माहिती अॅड. रोहिणी खडसे यांनी दिली. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AWpoNi
Post a Comment