Header Ads

ad

करोना: राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६ हजारांवर; 'हा' मोठा दिलासा

मुंबई: राज्यात पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या कमी होऊ लागली असून सक्रिय रुग्णांची संख्याही आता ३६ हजारांवर आली आहे. राज्यात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत असली तरी सध्याचे चित्र मात्र दिलासादायक आहे. ( ) वाचा: राज्यात संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला. त्यानंतर आता स्थिती वेगाने सुधारत आहे. वाढता असून मृत्यूंचे प्रमाणही कमी होत आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आजच्या आकडेवारीवर नजर मारल्यास गेल्या २४ तासांत राज्यात करोनाने आणखी ४९ रुग्ण दगावले आहेत. या साथीच्या विखळ्यात सापडलेल्या १ लाख ३९ हजार ११ जणांना आतापर्यंत प्राणास मुकावे लागले आहे तर एकूण ६३,६८,५३० रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. वाचा: करोनाची आजची स्थिती: - राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. - सध्या राज्यातील २.१२ टक्के एवढा आहे. - आतापर्यंत १ लाख ३९ हजार ११ रुग्ण करोनाने दगावले. - आज राज्यात ३ हजार १८७ नवीन रुग्णांचे निदान. - दिवसभरात ३ हजार २५३ रुग्ण बरे होऊन परतले घरी. - राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६८,५३० रुग्णांची करोनावर मात. - राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे. - आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८५,८४,८१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४७,७९३ (११.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले. - राज्यात सध्या करोनाचे ३६ हजार ६७५ . - सध्या राज्यात २,५२,३०९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ohV2S1

No comments