पुलावरील खड्ड्यांनी घेतला मायलेकाचा बळी; आई वडिलांना भेटायला जाताना...
जळगाव: येथून बहिणीसोबत दुचाकीने मधील येथे माहेरी येत असताना टँकरने दिलेल्या धडकेत चाकाखाली आल्याने दुचाकीवरील महिला व तिचा मुलगा ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली तर दुचाकी चालवत असलेली बहीण देखील या अपघातात जखमी झाली. ( ) वाचा: चारुशीला उर्फ प्राची राहुल पाटील (वय ४०, रा. एरंडोल) व त्यांचा मुलगा निशांत (वय १२) अशी मायलेकाची नावे आहेत. अपघातात मयत चारुशीला यांची दुचाकीस्वार शिक्षिका असलेली बहीण (वय ४५, रा. एसएमआयटी महाविद्यालयाजवळ, जळगाव) या जखमी झाल्या आहेत. एरंडोल येथे या पती राहुल पाटील व मुलगा निशांत यांच्यासह वास्तव्यास होत्या. त्यांची मोठी बहीण रुपाली पाटील या एरंडोल येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत. त्या जळगाव शहरातील एसएमआयटी महाविद्यालयाच्या परिसरात वडील लीलाधर पाटील व आई यांच्यासोबत राहतात. जळगाव ते एरंडोल त्या रोज दुचाकीने अपडाऊन करतात. वाचा: चारुशीला व त्यांचा मुलगा निशांत हे दोघे रुपाली यांच्यासोबत आज दुचाकीने (एम. एच. १९ डी.क्यू. ३८९६) जळगावातील मुक्ताईनगर येथे येत होते. मुक्ताईनगरात चारुशीला यांचे माहेर आहे. तिथे आई, वडिलांच्या भेटीसाठी त्या मुलासह चालल्या होत्या. यादरम्यान बांभोरी पुलावर खड्डयांमुळे तोल जावून दुचाकीसह तिघेही रस्त्यावर पडले. तेव्हाच मागून येणाऱ्या गॅस टँकरच्या चाकाखाली आल्याने चारुशीला व निशांत जागीच ठार झाले तर रुपाली पाटील यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iehlnP
Post a Comment