Header Ads

ad

Omicron latest update: मोठा दिलासा! आज राज्यात ओमिक्रॉनचे ५ नवे रुग्ण, सर्व पुण्यातील

मुंबई: राज्यातील कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला असताना दुसरीकडे राज्यात ओमिक्रॉनच्या (Omicron) नव्या रुग्णसंख्येतही घट पाहायला मिळत आहे. आज राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेले ५ नवे रुग्ण आढळले आहेत. हे सर्वच्या सर्व रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात आढळले आहेत. (omicron update maharashtra registered 5 new omicron cases today and all the patients are found in pune) राज्यात आतापर्यंत एकूण ३ हजार १३० रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत ६ हजार ६०५ जणांची चाचणी करण्यात आली. यांपैकी ६ हजार ५१० रिपोर्ट आले असून ९५ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी १ हजार ६७४ रुग्णांचा रुपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- काल राज्यात एकूण ८५ ओमिक्रॉन बाधित रुग्णांचे निदान झाले होते. या रुग्णांपैकी पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४४, मुंबईत ३९, पुणे ग्रामीण, अकोल्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला होता. मात्र, आज ओमिक्रॉनची रुग्णसंख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, आज राज्यात करोना बाधित रुग्णांची दैनंदिन रुग्णसंख्या घटली आहे. तसेच, करोनाच्या दैनंदिन मृत्यूसंख्येतही घट होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात २२ हजार ४४४ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज राज्यात एकूण ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ३९ हजार ०१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरत राज्यात आज एकूण २ लाख २७ हजार ७११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JAlFhfI38

No comments