Header Ads

ad

मुंबईहून गावी लग्नासाठी आलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

चिपळूण: जिल्हयात खेड तालुक्यात येथे चुलत बहिणीच्या लग्नासाठी मुंबईहून गावी आलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अचानक तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होतेय. क्लिक करा आणि वाचा- हर्षद सुभाष पाटील, (वय ३२, राहणार- मालाड) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. तो ५ रोजी लोटे येथे साखरपुडा व लग्नसोहळ्यासाठी आला होता. साखरपुडा आटोपून हर्षद व अन्य दोघेजण श्रीमती सरिता रमेश लांजेकर यांचे घरी झोपण्या साठी गेले असता ६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हर्षद याच्या छातीत अचानक दुखू लागले. तो अस्वस्थ होत बेशुद्ध झाला होता. मुंबईहून खास गावी लग्नसोहळया साठी आलेल्या भावावर काळाने असा घाला घातल्याने नातेवाईकांनाही त्याच्या अचानकपणे जाण्याने धक्का बसलाय. क्लिक करा आणि वाचा- हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला तात्काळ खेड येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याचा मृत्यू ह्दय विकाराने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज येथील डॉक्टरांकडून वर्तविण्यात आला आहे. या प्रकरणी येथील खेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणुन नोंद केली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xy8qAuL

No comments