Header Ads

ad

बिग बी अमिताभ बच्चन यांचा माजी अंगरक्षक जितेंद्र शिंदे निलंबित

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई कोट्यवधी रुपयांच्या कमाईचा आरोप असलेला अमिताभ बच्चन यांचा माजी अंगरक्षक कॉन्स्टेबल जिंतेद्र शिंदे याच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने निलंबित करून त्याच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ( amitabh bachchan jitendra shinde has been suspended) क्लिक करा आणि वाचा- अमिताभ बच्चन यांच्याकडे जिंतेद्र शिंदे अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. मात्र साधा कान्स्टेबल असलेला शिंदे वर्षांला एक कोटीपेक्षा अधिक रूपये कमावत असल्याची माहीती समोर येताच मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली. शिंदे याची अमिताभ यांच्या बंगल्यावरून दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. विभागीय चौकशीमध्ये शिंदे याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- कोणतीही परवानगी न घेता शिंदे याने तीन वेळा परदेश वारी केली. पत्नीच्या नावावर सुरक्षा एजन्सी सुरू केली मात्र याबदल्यात मिळणाऱ्या पैशांच्या नोंदी शिंदे याच्या खात्यावर आढळल्या. इतकेच नाही तर त्याने मालमत्ता घेतल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jYOlG7X

No comments