corona in mumbai: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; करोना रुग्णसंख्येत मोठी घट, ४ रुग्णांचा मृत्यू
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन (Coronavirus) रुग्णसंख्येत घट होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवारी मुंबईत एकूण ६४३ नव्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत आज ०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत आज १ हजार ४०२ करोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. आज निदान झालेल्या एकूण ६४३ रुग्णांपैकी ९२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरीत रुग्णांमध्ये लक्षणे नसल्याकारणाने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. (mumbai registered 643 new cases in a day with 1402 patients recovered and 04 deaths today) क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील एकूण बाधितांपैकी आतापर्यंत एकूण १० लाख २४ हजार ९९१ रुग्ण बरे झाले आहेत. या बरोबरच मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आहे ९७ टक्के. तर मुंबईत आज एकूण ६ हजार ३६७ रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा ६६६ दिवसांचा आहे. तर मुंबईत २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत रुग्णवाढ ०.१० टक्के इतकी आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. सध्या मुंबईतील ३ इमारती सील करण्यात आल्या असून आज नव्याने सापडलेल्या ६४३ रुग्णांपैकी ९२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई पालिकेकडील ३७ हजार १९२ बेड्सपैकी केवळ १ हजार ५५८ बेडचा वापर करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती > २४ तासात बाधित रुग्ण- ६४३ > २४ तासात बरे झालेले रुग्ण- १४०२ > बरे झालेले एकूण रुग्ण- १०२४९९१ > बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७% > एकूण सक्रिय रुग्ण- ६३६७ > दुप्पटीचा दर- ६६६ दिवस > कोविड वाढीचा दर (२९ जानेवारी- ०४ फेब्रुवारी)-०.१०% क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LFOvoU7
Post a Comment