स्वीगी बॉयचा प्रताप; गळ्यावर चाकू ठेवून केली सव्वा दहा लाखाची लूट
ठाणे: घरी एकटे आहात... भूक लागली आहे.. काही खायला ऑनलाईन ऑर्डर करताय.. तर सावधान.. कारण ठाण्यात ऑनलाईन ऑर्डर घेऊन आलेल्या एका तरुणाने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आणि काही रोकड असा एकूण १० लाखाहून अधिकचा मुद्देमाल लुबाडून पोबारा केल्याची घटना घडली आहे. भर दिवसा ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नौपाडा पोलीस करत आहेत. ( robbed rs 10 lakh 25 thousand by showing fear of a knife in thane) सध्या सगळीकडे ऑनलाईनचा जमाना आला आहे. सुईपासून ते मशीनपर्यंत आणि किराणापासून ते खाद्य पदार्थांपर्यंत सर्व वस्तू घरबसल्या मोबाईलवरून मागवता येतात. त्यामुळे आजकाल बहुतेक जण विविध हॉटेलमधून खाद्य पदार्थ स्वीगी किंवा झोमॅटोच्या माध्यमातून ऑनलाईन ऑर्डर करतात. ठाण्यातील नौपाडा येथील पाचपाखाडी परिसरातील ३९ वर्षीय एका महिलेने देखील अशा प्रकारे घरबसल्या स्वीगीच्या माध्यमातून ऑनलाईन खाद्य प्रदार्थ ऑर्डर केली. काही वेळाने ही ऑर्डर घेऊन महिलेच्या घरी पोहचला. त्यानंतर महिला घरी एकटीच असल्याचा अंदाज घेत, या स्वीगी बॉय ने महिलेकडे पिण्यासाठी पाणी मागितले. महिला पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली असता या स्वीगी बॉयने घरात घुसून महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चाकूचा धाक दाखवत या स्वीगी बॉयने महिलेला बेडरूममध्ये नेवून कपाटात ठेवलेले सोन्या – चांदीचे आणि हिऱ्याचे दागिने तसेच काही रोक रक्कम असा एकूण १० लाख २० हजारांचा मुद्देमाल लुबाडून तेथून पोबारा केला. क्लिक करा आणि वाचा- ९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नौपाडा परिसर हा रेल्वे स्थानक जवळ असलेला परिसर आहे. अशा शहरी भागात हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या अशा प्रकारची घटना घडल्यामुळे परिसरात एकच भीतीदायक वातावरण पसरले आहे. घटना घडल्यानंतर महिलेने या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत महिलेची तक्रार नोंदवून घेतली. क्लिक करा आणि वाचा- तसेच या प्रकरणी सूत्रांचा आणि यांत्रिक यंत्रणांचा वापर करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु अशा प्रकारच्या घटनांपासून वाचण्यासाठी घरी एकट्या असलेल्या महिला आणि वृद्धांनी ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर सतर्कता बाळगली पाहिजे, शक्यतो अनोळखी व्यक्तींना घरात घेऊ नये असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ke238WQ
Post a Comment