टाळे तोडण्यासाठी चोरट्याने बनवली विशेष कटावणी; केल्या ४१ घरफोड्या, पण...
कल्याण: घरफोड्या करताना टाळे तोडण्यासाठी विशेष कटावणी बनवत मुंबई ठाणे परिसरात तब्बल ४१ घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मूळचा तामिळनाडूमधील नारायण तेवर हा फिरस्ता आहे. नारायण गेली अनेक वर्ष मुंबई, ठाण्यासह आसपासच्या भागात घरफोड्या करत होता. मागील तीन महिन्यापूर्वी एका गुन्ह्या शिक्षा भोगून तो तुरुंगातून परतला होता. ( who committed theft 41 times in kalyan) काही दिवसांपूर्वी कल्याण कोळशेवाडी परिसरात एका किराणा दुकानामध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. कोसळेवाडी पोलिसांचे गस्ती पथक गस्त घालत असताना त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना तत्काळ घटना स्थळी तपास सुरू केला पोलिसांना मोबाईल आढळून आला. सदर मोबाईल व परिसररातील सीसीटीव्हीच्या आधारे या चोरीचा तपास कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरिदास बोचरे यांच्या टीमने सुरू केला. क्लिक करा आणि वाचा- तपासादरम्यान सदर चोरटा कल्याण आनंदवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंदवाडी परिसरात सापळा रचत नारायण तेवर या केली. नारायण हा सराईत चोरटा असून त्याने त्याच्या विरोधात मुंबई, ठाणे परिसरात घरफोड्या केल्या होत्या. विशेष म्हणजे घरफोड्या करताना दुकानाचे घराचे टाळे तोडण्यासाठी विशेष कटावणी बनवून घेतली होती. क्लिक करा आणि वाचा- मुंबई ठाणे परिसरात त्याने तब्बल ४१ घरफोड्या केल्या असून त्याने दोन गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती कोळशेवाडी पोलिसांनी दिली. त्याच्या कडून रोख रक्कम, व दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ३२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gaXvkSy
Post a Comment