Breaking सोलापूर: वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात; ८ ठार
सोलापूर: वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला झालेल्या सुमारे ८ ते १० वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ३५ ते ४० वारकरी जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व वारकरी हे तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील रहिवाशी आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडीनजिक भरधाव वेगात असलेल्या एका मालवाहू ट्रकने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. (8 to 10 warkaris lost lives and 35 to 40 were injured in a tragic accident on solapur pune national highway) अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावातील ५० ते ५५ वारकरी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. मात्र, त्याची ट्रॅक्टर ट्ऱॉली कोंडीजवळ आली असताना समोरून भरधाव येणाऱ्या मालवाहू ट्रकने ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ही ट्रॅक्टर ट्रॉली सुमारे ६०० फूट अंतरापर्यंत फरफटत गेली इतका हा अपघात भीषण होता. या अपघातात ८ ते १० वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर, ३५ ते ४० वारकरी जखमी झाले. क्लिक करा आणि वाचा- या अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातातील ३५ ते ४० जखमींवर उपचार सुरू असून या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्लिक करा आणि वाचा- परभणीतही भीषण अपघात, ३ ठार काल रविवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणाजवळही भीषण अपघात झाला. हा अपघात बस आणि दुचाकीच्या धडकेमुळे झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. अपघातामध्ये अतिक रफिक तांबटकरी, शेख अमीर शेख नजीर, शेख मोबीन शेख खालेद (रा. सेलू) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अपघातात दोघे जखमी झाले आहेत. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Q5cnky7
Post a Comment