Header Ads

ad

Eknath Shinde: रशिया-युक्रेन युद्धामुळे राज्यात महागाईची चिंता; मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

ठाणे: सध्या रशिया युक्रेन युद्धामुळे देशात आणि राज्यात होण्याची चिंता भासू लागली आहे. मात्र या युद्धासाठी आपण काही करू शकत नसलो तरी देशात आणि राज्यात महागाईचा लोकांना त्रास होणार नाही याची काळजी नक्कीच केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेईल असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे गडचिरोली पालकमंत्री यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यात क्रेडाई आयोजित एमसीएचआय यांच्या मालमत्ता प्रदर्शन निमित्त उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी ठाणे शहराच्या विकासाला अशा प्रकारच्या प्रदर्शनामुळे चालना मिळते. त्याच बरोबर ठाणे शहरामध्ये आपण मोठा इफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुरु असून याचा फायदा शहराच्या विकासासाठी होणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच देशातील आणि राज्यातील इतर घटनांवर आपले मत मांडले. (minister said that the central government and the state government will take care that does not affect the people in the state) राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा प्रकल्प असून राज्य सरकारच्या खर्चातून सुरु असून हा गेम चेंजर प्रकल्प असल्याचे सांगितले. राज्य सरकारकडून तब्बल ५५ हजार कोटी रुपयांचा खर्च केलेला हा प्रकल्प असून राज्यासह देशासाठी हा एक महत्वाचा प्रकल्प असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. या समृद्धी महामार्गाचा राज्यालाच नव्हे तर देशाला फायदा होणार असल्याची माहिती देखील यावेळी शिंदे यांनी दिली. भविष्यात हा महामार्ग गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली शहरांना जोडणार आहे. तसेच देशातील दोन ते तीन राज्यांना या समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा फायदा होणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे दोन ते तीन राज्य एकमेकांसोबत जोडले जाणार असल्याची माहिती यावेळी नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- युक्रेन आणि रशिया येथील सुरु असलेल्या युद्धामुळे देशात महागाई वाढणार असल्याच्या बातम्या पसरू लागल्या आहेत. शेवटी रशिया युक्रेनच युद्ध आहे त्यात आपण काही करू शकत नाही. मात्र अद्याप तरी महागाई वाढण्याचे काही कारण नाही. केंद्र आणि राज्य सरकार ज्या ठिकाणी जनतेला आराम द्यायचा आहे तो देईल. देशात आणि राज्यात महागाईचा लोकांना त्रास होणार नाही याची काळजी नक्कीच केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेईल असा विश्वास देखील यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे आणि गडचिरोली पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4VpBGJs

No comments