Header Ads

ad

'त्या' रिक्षाचालकांचे सर्वत्र होतेय कौतुक; कुराण आणि हनुमान चालिसाचे केले एकत्र पठण

पिंपरी चिंचवडमध्ये हिंदू व मुस्लिम धर्मीय रिक्षा चालकांनी एकत्र येत कुराण व हनुमान चालिसाचे एकाच कार्यक्रमात पठण केले. या द्वारे या रिक्षा चालकांनी हिंदू-मुस्लिम एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला. सध्या मुस्लिम धर्मीयांचा रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. तर, रविवारी राम नवमीचा दिवस होता. दोन्ही धर्मांतील सणाचं पावित्र्य आणि आदर राखत काल रविवारी हिंदू व मुस्लिम बांधवांनी हनुमान चालीसा आणि कुराण मधील सुराह अल फतेह या आयतींचे एकत्र पठण केले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/z75kbK3

No comments