'हिंदू तरुणांनो, हातात तलवारही ठेवा'; साध्वी सरस्वती यांचे वादग्रस्त विधान
धुळ्यात प्राचीन राम मंदिराजवळ रामनवमीनिमित्त आयोजित धर्मसभेत विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांनी खळबळजनक विधान केले आहे. 'द कश्मीर फाइल्स', या चित्रपटाच्या विषयाला अनुसरून साध्वी सरस्वती यांनी, 'धुळ्यात देखील दुसऱ्या कश्मीर फाइल्सची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी एक लाख रुपयाचा मोबाईल, लॅपटॉप हातात बाळगणाऱ्या हिंदू तरूणांनी एक हजार रुपयाची तलवार देखील हातात ठेवावी', असे विधान केले आहे. अस्त्र-शस्त्र ठेवणे हे तर आपल्या हिंदूंची शान आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hgL08JI
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hgL08JI
Post a Comment