अवकाळी पावसाचा तडाखा; वीज अंगावर पडून मेंढपाळासह १० मेंढ्या जागीच ठार, चौघे जखमी
कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे नरळे वस्तीनजीक वीज पडून एक शेतकरी व त्यांची दहा मेंढरे जागीच ठार झाली आहेत. सायंकाळच्या सुमारस ही घटना घडली आहे. या घटनेत रामचंद्र पांडुरंग गडदे (वय- ४५, राहणार,नांगोळे ता.कवठेमहांकाळ) यांचा मृत्यू झाला आहे. रामचंद्र गडदे हे आपली मेंढरे घेऊन चरवण्यासाठी गावातील नरळे वस्तीवर असणाऱ्या शिवारात गेले होते. तसेच अन्य मेंढपाळ देखील याठिकाणी आपल्या मेंढ्या चरवण्यासाठी आले होते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9ElcfW4
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9ElcfW4
Post a Comment