नांदेडमध्ये खळबळ! शहरात भर रस्त्यात वर्तमानपत्राच्या संपादकाची हत्या
नांदेड शहरात 'स्वतंत्र मराठवाडा' या वर्तमानपत्राच्या संपादकाची भर रस्त्यात हत्या झाल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. प्रेमानंद जोंधळे असे या संपादकाचे नाव आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास भर रस्त्यावर हा प्रकार घडल्याने नांदेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोराने जोंंधळे यांच्या पोटावर आणि छातीवर चाकूने जवळपास ७ ते ८ वार केले. चाकूने वार करून आरोपी पळून गेला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/R7hseD6
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/R7hseD6
Post a Comment