कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना पेट्रोलचा भडका; १० ते १२ जण भाजले
पुण्यातील कैलास स्मशानभूमीत एका पार्थिवावरील अंत्यसंस्कारासाठी लाकडाची चिता रचण्यात आली होती. या वेळी पेट्रोलचा कॅन खाली पडून आगीचा भडका उडाल्याने लागलेल्या आगीत दहा ते बारा जण काही प्रमाणात भाजल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे सर्वजण अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आले होते. रात्री सात जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भाजलेल्यांपैकी ३ ते ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Tu01ecC
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Tu01ecC
Post a Comment