bogus doctors: नाशिकमध्ये खळबळ; जिल्हा रुग्णालयात आढळल्या तीन बोगस महिला डॉक्टर
नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात या बोगस महिला डॉक्टर वावरत होत्या. त्या या रुग्णालयातील डॉक्टर नाहीत हे त्यांच्या वावरण्यावरून इंचार्ज सिस्टरच्या लक्षात आले. या सिस्टरने या डॉक्टरांना गाठून त्यांची विचारपूस करणे सुरू केले. मात्र या बोगस डॉक्टरांनी समाधानकारण उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर काहीतरी गडबड असल्याचे इंचार्ज सिस्टरच्या लक्षात आले. त्यानंतर सिस्टरने हा सगळा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर प्रशासनाने या तीन महिला डॉक्टरांना पोलिसांच्या ताब्यात दिल्या.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Dh9vti7
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Dh9vti7
Post a Comment