Header Ads

ad

मलाही वाटते की उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हावे; गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी आपली इच्छा असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानीला पक्षाचा मुख्यमंत्री व्हावे, असे साकडे घातले होते. तर आज सातारा येथील एका कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केले आहे. याला उत्तर देताना पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zTaycUn

No comments