धक्कादायक! नियम तोडणाऱ्या कार चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेले
नवी मुंबईतील घारघर येथील कोपरी उड्डाणपुलाजवळ बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एका उलट्या दिशेने येणाऱ्या एका कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुजोर कारचालकाने कार थांबवली नाही. त्याने आपली कार तशीच सुरू ठेवत पोलीस कर्मचाऱ्याला ठोकरले. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याला कारचालकाने बोनेटवरून सुमारे १०० मीटर फरफटत नेले. मुजोर कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/43mEj5N
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/43mEj5N
Post a Comment