Header Ads

ad

राणेंशी पंगा घेणं नडलं, केसरकरांचं पद अवघ्या दीड महिन्यात जाणार?, एकनाथ शिंदे कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत

दीपक केसरकर यांची राणेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांचं कट्टर राजकीय वैमनस्य संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. इकडे राज्यात शिंदे-फडणवीसांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असली तरी संधी मिळेत तेव्हा केसरकर नारायण राणे यांच्यावर तोफ डागत राहिले. अगदी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नारायण राणेंनी वारंवार आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन बदनामी केली, असा गंभीर आरोप केसरकरांनी राणेंवर केला. त्यानंतर मात्र नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र चांगलेच खवळले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pSD0HjE

No comments