Header Ads

ad

हे वागणं बर नव्हे, गुरुजी! 'फुल टू' शिक्षकाचा तुफान राडा; पोलिसांनाही केली धक्काबुक्की

तारु पिंपळवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले अशोक जिजाऊ पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दारू पिऊन दारूच्या दुकानात गोंधळ घातला. त्यानंतर पोलीस ठाण्यात आल्यावर पुन्हा गोंधळ घालायला सुरवात केली. यावेळी समज देणाऱ्या पोलिसांना सुध्दा शिवीगाळ करायला सुरुवात केली. दरम्यान पोलीस ठाण्यात उपस्थितीत असलेल्या महिला पोलिसांना सुद्धा या गुरुजींनी शिवीगाळ करत गुन्हा का दाखल करत नाही म्हणून गोंधळ घातला.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/t8IPZqB

No comments