Header Ads

ad

'साहेब, काय चाललंय?'; चिमुकल्याने केला मंत्र्यालाच प्रश्न, मंत्री झाले अवाक्

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मतदारसंघातल्या पलूस तालुक्यातल्या बुर्ली या ठिकाणी आले होते. त्यांनी एका कार्यकर्त्याच्या घरी चहा घेतला आणि मंत्री कदम घरातून बाहेर पडले. आजूबाजूला पोलीस आणि कार्यकर्त्यांचा लवाजमा होता. वाट काढत जात असताना, त्याच्या समोर शाळा सुटलेली चिमुकल्यांची फौज थांबले होती. मंत्री विश्वजीत कदम यांना पाहताच हस्तांदोलन करण्यासाठी चिमुकल्यांचे हात पुढे आले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zhy0EvI

No comments