Bus Accident: धावत्या बसमध्ये चालकास भोवळ आल्यामुळे अपघात; पुढे जे घडले ते धक्कादायक!
जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात कळमनुरी-औरंगाबाद या बसला झालेल्या अपघातात बस चालकासह काही प्रवासी जखमी झाले. या बसच्या बस चालकाला धावत्या बसमध्येच भोवळ आल्याने बसला अपघात झाला. या अपघातात काही नागरीक जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालायात दाखल करण्यात आले. ही बस शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात आली असता बस चालकाला अचानक भोवळ आल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला. यावेळी बस निळकंठ हॉटेल समोर उभ्या असलेल्या नागरीक व वाहनांना ठोकरून थेट झाडावर जाऊन आदळली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0Ly3nqo
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0Ly3nqo
Post a Comment