डॉक्टरांची कमाल! गरोदर महिला कण्यातील विकाराने त्रस्त, १७ डॉक्टरांच्या टीमने केली व्हॅक्यूम सहाय्यक प्रसूती
Successful vacuum assisted delivery : जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील २१ वर्षीय गोदा गुडेकर यांना शुक्रवारी सकाळी जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण या महिलेला कायपोस्कोलिओ हा आजार आहे. हा आजार असल्यानं गोदा यांचा पाठीचा मणका हा वाकडा आहे. शिवाय गर्भाशयात बाळाला आवश्यक तेवढी जागा मिळाली नाही. त्यामुळे अशा रुग्णांची प्रसूती करणं डॉक्टरांसमोर मोठं आव्हान असतं.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/cAb4i6t
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/cAb4i6t
Post a Comment